तापमानात घट; मात्र थंडी नाही

पुणे -राज्यात हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात थंडी वाढण्यास सुरूवात झाली असून, शहरातील तापमानात घट होत आहे. मात्र, अद्यापही थंडीचा फारसा प्रभाव जाणवत नसला तरी येत्या काही दिवसात शहरासह राज्यात थंडी वाढेल, अशी शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविली आहे. 

राज्यात विदर्भाच्या काही भागात थंडीने पुन्हा जम बसविला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात गारठा वाढला आहे. विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 8.5 अंश सेल्सिअस इतक्‍या कमी तापमानाची नोंद झाली.

तर शहरातही पहाटे आणि सायंकाळी थंडीची चाहुल जाणवत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार शनिवारी शहरात कमाल तापमान 28.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीच्या तुलनेत किमान तापमान 2.3 अंश सेल्सिअसने अधिक आहे.

दरम्यान, देशाच्या उत्तर-पूर्व भागात 21 डिसेंबरनंतर थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असून, त्याचा परिणाम राज्यातील हवामानावरही होऊ शकतो. त्यामुळेच आगामी काही दिवसात राज्यात थंडीची वाढेल, असा अंदाज विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.