सौदी अरबच्या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला

हल्ल्यामुळे तेल कंपनीतील दोन संयंत्रात आगीच तांडव

सौदी : सौदी अरबच्या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर विद्रोह्यांकडून ड्रोन हल्ला करण्यात आला असल्याचे सौदीच्या सरकारी गृहमंत्रालयाने म्हटले आहे. शनिवारी सकाळी सौदीच्या अरामकोच्या दोन तेल संयंत्रांवर विद्रोह्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर दोन्ही तेल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली होती.

अरामको या तेल कंपन्यांच्या अब्कैक आणि खुरैस या दोन संयंत्रात ड्रोनव्दारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात मोठी आग लागली असल्याचेही समोर आली आहे. दरम्यान, इथल्या सुरक्षा रक्षकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तर दुसरीकडे सरकारी वृत्तसंस्थेकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर याची चौकशी सुरू करण्यात आली आहे पंरतु, ड्रोनच्या हल्ल्याचे आणखी स्त्रोत मिळाले नसल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)