भरधाव ट्रकची कारसह दुचाक्‍यांना धडक 

नऱ्हेतील घटना, युवतीसह चौघे जखमी

हेल्मेटमुळे वाचले प्राण

ट्रकने अचानक कार आणि दोन्ही दुचाक्‍यांना धडक दिल्याने तिघेजण रस्त्यावर कोसळले. त्यातील दुचाकीचालक राजू कांबळे आणि काळुराज जाजु यांनी हेल्मेट परिधान केले होते. त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. मात्र, जाजु यांची मुलगी करूणा हिने हेल्मेट घातले नसल्याने तिच्या डोक्‍यास मार लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धायरी / पुणे – भरधाव ट्रकने कारसह दोन दुचाक्‍यांना धडक दिली. या अपघातामध्ये कार चालकासह चौघे जखमी झाले आहेत. मुंबई-बेंगळुरु महामार्गावर गुरुवारी सकाळी नऱ्हे परिसरात हा अपघात झाला. प्रफुल पाठक (31 ,रा. मानाजीनगर, कुटेमळा, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाफर नबीसाब गंगावती (38, रा. श्रीहट्टी, जि. गदक कर्नाटक) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाठक हे कारमधून गुरुवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, कात्रज बोगद्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला तसेच बाजुच्या दोन दुचाक्‍यांना धडक दिली. यामध्ये फिर्यादी पाठक यांच्यासह दुचाकीचालक राजु पांडुरंग कांबळे (39, रा.भुमकर नगर, नऱ्हे), काळुराम बद्रीनारायण जाजु (61) आणि त्यांची मुलगी करूणा काळुराम जाजु (30 दोघे रा. ओमशांती रेसिडेन्सी, नऱ्हे) हे चौघे जण जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.