नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नवीन योजना जाहीर केली आहे, या योजनेअंतर्गत कोणतेही पर्यटक वाहन चालक ऑनलाइन पद्धतीने अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरणाच्या परवान्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि शुल्क जमा झाल्यानंतर परवाना जारी केला जाईल. या संदर्भातील नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे.
या नवीन नियमांमुळे आपल्या देशातील विविध राज्यांमधील पर्यटनाला दूरगामी चालना मिळणे अपेक्षित आहे.यासह राज्य सरकारांच्या महसुलातही वाढ होईल. मालवाहतूक वाहनांना राष्ट्रीय परवाना पद्धतीअंतर्गत यशस्वीरीत्या आणल्यानंतर मंत्रालयाने , पर्यटक प्रवासी वाहनांची वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने हे नवीन नियम जारी केले.
गेल्या पंधरा वर्षात आपल्या देशात प्रवास आणि पर्यटन उद्योग अनेक पटीने वाढला असून त्यादृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत. या वाढीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे योगदान आहे आणि ग्राहकांच्या अनुभवाचा कल आहे.