Drivers’ Day – भारतातील रस्ते वाहतूक वाढली आहे. त्यामुळे ड्रायव्हरच्या कामाचे महत्त्व वाढत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील वाहतूकदारांच्या संघटनेने 24 जानेवारी रोजी ड्रायव्हर्स डे साजरा करण्याचे ठरविले आहे. यामुळे जनतेला आपल्या जीवनातील ड्रायव्हरचे महत्त्व लक्षात येईल, असे सांगण्यात आले. या संदर्भातील निवेदन राज्य सरकारला दिले आहे.
राज्य सरकारने आमच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब करावे आणि सरकारच्या वतीने 24 जानेवारी हा दिवस ड्रायव्हर्स डे म्हणून पाळला जावा, असे आम्ही सांगितले आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. 18 एप्रिल रोजी राजधानीत चांगले ड्रायव्हिंग करणार्या 42 ड्रायव्हरचा सत्कार करण्यात आला होता.