लखनौ – उत्तर प्रदेशातील लखनौमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक तरुणी रस्त्यावर एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. तरुणी एकमागून एक तरुणाच्या कानशिलात लगावत आहे. हा व्हिडीओ कृष्णानगर पोलीस हद्दीतील आहे.
दुसऱ्या कारची धडक आपल्या कारला लागल्याच्या रागातून तरुणीने दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला रस्त्यावरच मारहाण केली. यावेळी चौकात वाहतूक कोंडी झाली होती. नाक्यावरील पोलीस कर्मचारीदेखील तरुणीची वागणूक बघून तातडी तिथे गेले. मात्र तरुणीच्या जवळ जाण्याची त्यांनी हिंमत केली नाही. अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे पोलिसही हादरून गेले होते.
कारमधून जाणाऱ्या एका तरुणाने तरुणीला धडक दिली होती. यामुळे संतापलेल्या तरुणीने आरोपी ड्रायव्हरला गाडीखाली उतरवलं, आणि त्याला मारहाण केली. याशिवाय ड्रायव्हरसोबत असलेल्यांचाही तरुणीने समाचार घेतला.
तरुणाला काही कळायच्या आत तरुणी एकामागोमाग एक कानशिलात लगावत राहिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तरुणीने अत्यंत रागाने ड्रायव्हरची मारहाण केली. ड्रायव्हर तरुणीचा मार खाताना तिची विनवणी करीत होता. मात्र तरुणी काहीच ऐकायला तयार नव्हती.