रहिमतपूर येथील चालकाचा खून

औंध – पुसेसावळीहून रहिमतपूरकडे टेम्पो (छोटा हत्ती) घेऊन निघालेल्या चालकाचा कळंबी येथील सिद्धनाथ दूध संकलन केंद्रासमोरील रस्त्यावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला. रविराज लोखंडे (वय 42) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणे वाजण्याच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी, रहिमतपूर येथील रविराज लोखंडे हे टेम्पो चालक असून बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान ते पुसेसावळीहुन टेम्पो घेऊन रहिमतपूरकडे निघाले होते. कळंबी येथील सिद्धनाथ दूध संकलन केंद्रासमोरील रस्त्यावर टेम्पो आला असताना अज्ञातांनी टेम्पो अडवून लोखंडे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि पळून गेले.

ही घटना कळंबी येथील ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबीचे पोलीस पाटील यांनी तात्काळ औंध पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या लोखंडे यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र लोखंडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.