मुंबई – अभिनेता आमिर खान, आर. माधव, शर्मन जोशी आणि करीन कपूर अशी दमदार स्टार कास्ट असलेला ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटवर या चित्रपटातील एक पोस्टर शेअर केलं आहे.
या पोस्टरमध्ये आमिर, शर्मन जोशी आणि आर. माधवन हे तिघे एकाच स्कूटीवरुन बिना हेल्मेट जाताना दिसतात. पोलिसांनी या तिघांच्या फोटोसह ‘जाने तुझे देंगे नही’ असं लिहित, अनोख्या पद्धतीने नागरिकांना रोड सेफ्टीबाबत माहिती दिली आहे.
Dil Jo Tera Baat Baat Pe Ghabraaye,
Driver Idiot Hai, Pillion Pyaar Se Usko Samjha Le #AalIzzNotWell #RoadSafetyWeek @ActorMadhavan pic.twitter.com/tsHr8Izw86— Maharashtra Police (@DGPMaharashtra) January 13, 2020
महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी पोस्टर शेअर करत, “दिल जो तेरा बात बात घबराये… ड्रायव्हर इडियट है… प्यार से उसको समझा ले”. या पोस्टमध्ये पोलिसांनी म्हंटल आहे.
I agree WHOLE Heartedly.. https://t.co/G09LRtY6LL pic.twitter.com/UCGVmSPoD5
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) January 15, 2020
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटला आर. माधवनने एक फोटो शेअर करत उत्तर दिलंय. या फोटोमध्ये तो हेल्मेट घालून, गाडी चालवताना दिसतोय… मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. असं त्यानं सांगितलंय. तसेच माधवनच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी सुद्धा जोरदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
Avoid being a danger to yourself and others, secure yourself so you can save another. #RoadSafetyWeek #RoadSafety #RoadSafetyAwareness pic.twitter.com/hAOMY9db2K
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) January 17, 2020