Drishyam3: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दृश्यम ३’ (Drishyam3) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपट रिलीज होताच सोशल मीडियावर त्याच्या पहिल्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असून प्रेक्षकांकडून चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक थिएटर्समध्ये ‘हाऊसफुल’चे बोर्ड लागल्याने चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठा प्रभाव पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘दृश्यम’ मालिकेचे पहिले दोन भाग प्रचंड लोकप्रिय ठरले होते. सस्पेन्स, थरार आणि कौटुंबिक भावना यांचा उत्तम मेळ असल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. त्यामुळे ‘दृश्यम ३’कडूनही चाहत्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. रिलीजच्या पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपटही सुपरहिट ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Drishyam3) विशेष म्हणजे, मोहनलाल यांच्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरला. चित्रपटात पुन्हा एकदा रहस्य, धक्कादायक ट्विस्ट आणि भावनिक प्रसंगांचा जबरदस्त संगम पाहायला मिळत असल्याचे प्रेक्षक सांगत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी चित्रपटाला “ब्लॉकबस्टर” आणि “माइंड ब्लोइंग थ्रिलर” असे म्हटले आहे. Drishyam 3 ‘दृश्यम ३’ (Drishyam3) हा चित्रपट तब्बल ६५ देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिलीज होणाऱ्या मोजक्या भारतीय चित्रपटांमध्ये याची गणना होत आहे. परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडताच सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया शेअर करत आहेत. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मोहनलाल स्वतः थिएटरमध्ये पोहोचले होते. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते चाहत्यांना भेटताना आणि थिएटरमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. चाहत्यांनीही त्यांचे जोरदार स्वागत केले. (Drishyam3) ‘दृश्यम’ मालिकेची खासियत म्हणजे साध्या माणसाची बुद्धिमत्ता आणि कुटुंबासाठी केलेला संघर्ष. त्यामुळे ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे. तिसऱ्या भागातही प्रेक्षकांना अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या कमाईबाबत अधिकृत आकडे अद्याप समोर आले नसले, तरी सुरुवातीचा प्रतिसाद पाहता ‘दृश्यम ३’ बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम करू शकतो, असे चित्रपट विश्लेषकांचे मत आहे.