मुंबई – ‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असला तरी, अभिनेता अजय देवगणनच्या या चित्रपटाच्या रिमेकने 2015 मध्ये एक जबरदस्त थ्रिलर कथा लोकांना दिली आहे. आणि त्यानंतर गेल्या 7 वर्षांपासून चाहते ‘दृश्यम 2’ ची वाट पाहत होते. मात्र, अखेर ‘दृश्यम 2’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून,
View this post on Instagram
चित्रपटाच्या कथेने सिनेरसिकांचे जबरदस्त मनोरंजन केले आहे. यंदाच्या या ‘दृश्यम 2’ चित्रपटात एक नवीन मजबूत पात्र जोडले गेले आहे, हे पात्र म्हणजे, अभिनेता ‘अक्षय खन्ना’ सिनेमात या अभिनेत्याचा जबरदस्त लुक आणि ऍक्टिंग प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.
आणि याच मुळे हा चित्रपट अद्यापही बॉक्स ऑफिसवर तग धरून राहिला आहे. त्यामुळेच का होईना अनेक बडे चित्रपट मागे पडल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, आता सिनेरसिकांना हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.
अद्याप हा चित्रपट प्रेक्षकांना मोफत पाहता येणार नाही. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही पैसे मोजावे लागणार आहेत. ‘दृश्यम 2’ हा चित्रपट वर्ष सरता सरता बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला आहे. एकंदरीत वर्षाच्या शेवटी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले आहेत.