सर्जेपुरात पिण्याच्या पाण्याची गळती

पाइपलाइनचा व्हॉल्व जाणीवपूर्वक बिघडवल्याची चर्चा
नगर –
शहराच्या सर्जेपुरा भागात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयालगत पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून सोमवार (दि.6) रोजी सकाळी पाणीगळती सुरू झाली होती. पाइपलाइनवरचा व्हॉल्व काहींनी जाणीवपूर्वक बिघडवल्याने ही पाणीगळती होत असल्याचे बोलले जात होते. दुष्काळी परिस्थितीत शहरात पाइपलाइनमधून अशी पाणीगळती होत असल्याने काहींनी चिंता व्यक्त केली.

सध्या जिल्ह्यात आजतक 771 टॅंकरने दुष्काळी भागात पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा जपूण वापर करवा असे अनेक वेळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटण्याच्या घटणा वारंवार घडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
शनिवारी महापालिकेच्या जुन्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम प्रशासनामार्फत हाती घेण्यात आले होते. त्यासाठी शनिवारी (दि.4) पाणी योजनेवर शटडाऊनही घेण्यात आले. मात्र, दुरुस्तीच्या कामाला विलंब होत असल्याने शहर व उपनगर भागात रविवारी पाणी पुरवठा झाला नाही. आज सर्जेपुरा भागात पुन्हा पाइपलाइन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाल्याने रस्त्यावर ते पाणी वाहत होते. तर हे पाणी पिण्याचे असल्यामुळे आजूबाजूच्या महिलांनी पाणी भरून घेण्यासाठी मोठी गर्दी केली. पाणी भरून घेण्यासाठी काहींनी पाइप लावले पाहावयास मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.