सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यायल्याने होतील ‘हे’ चमत्कारीक फायदे!

पुणे – अनेक दशकांपासून, विविध आरोग्य फायद्यांसाठी लिंबू रस वापरले जाते. करोनाच्या काळात त्याचा कल आणखी वाढला. परिणामी, जे चहा आणि कॉफीने दिवसाची सुरुवात करीत असत त्यांनी सकाळी लिंबूपाणी पिण्यास सुरुवात केली.

आयुर्वेदाबरोबरच ऍलोपॅथीने देखील लिंबाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले आहे. एका अभ्यासानुसार लिंबू पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी, अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि आपल्याला रोगांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लिंबू पाणी पिणे शरीरातील जळजळ कमी करण्याबरोबरच आंतर प्रणाली स्वच्छ करण्यास मदत करू शकते. लिंबू पाणी नियमित प्यायल्याने पित्त कमी होतो आणि यूरिक ऍसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते.

आरोग्य तज्ञांच्या मते, जर लिंबूरस कोमट पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी प्यायले गेले तर ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. चला तर, जाणून घेऊया लिंबू पाण्याचे चमत्कारिक फायदे.

* रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे
आरोग्य तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी सेवन केल्यास लिंबाच्या पाण्याचे जास्तीत जास्त लाभ मिळू शकतात. हे यकृत उत्तेजित करून पित्त प्रवाह सक्रिय करते आणि एंजाइम फंक्शन वाढवते. अशा प्रकारे, शरीरातून सर्व प्रकारचे विष काढून टाकणे सोपे होते. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

* रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात उपयुक्त
करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येकजण प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त आहे. या प्रकरणात लिंबू पाणी पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू सारखी सिट्रस फळे व्हिटॅमिन-सी चा चांगला स्त्रोत मानली जातात जी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी हृदयरोग आणि स्ट्रोकसह कमी रक्तदाबाचा धोका कमी करू शकते. एका लिंबाच्या रसातून सुमारे 18.6 मिग्रॅ च्या प्रमाणात व्हिटॅमिन-सी मिळू शकते.

* त्वचा चमकदार होते
लिंबामध्ये आढळणारे व्हिटॅमिन-सी त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर त्वचेतील आर्द्रता कमी झाली तर ती कोरडी होते आणि सुरकुत्या येण्याचा धोका वाढतो. 2016 च्या प्रयोगशाळेच्या अभ्यासानुसार असे सुचवले आहे की लिंबूवर्गीय पेय त्वचेमध्ये सुरकुत्या तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

* वजन कमी करण्यासाठी प्रभावी
संशोधन दर्शविते की लिंबामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडंट्स लठ्ठपणाला कारणीभूत घटक कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. उंदीरांवर केलेल्या अभ्यासात त्याचे विशेष फायदे दिसून आले आहेत. अभ्यासातील शास्त्रज्ञांना असेही आढळले आहे.

की लिंबामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट संयुगे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन प्रतिरोध सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहेत, ज्यामुळे टाइप -2 मधुमेहाचा धोका देखील कमी होऊ शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.