नगर – रस्त्याच्या कडेला दारूच्या नशेत तूर्त होवून पडलेल्या दारूडच्या खीशातील पैशावर दोघांनी डल्ला मारल्याची घटना गुरूवारी भर दुपारी एकच्या सुमारास माळीवाडा बस स्थानक परिसरात घडली.
गुरूवारी ड्राय डे होता. ड्राय डे च्या दिवशीच एक दारूडा दारू पिऊन माळीवाडा बस स्थानक परिसरात पडलेला होता तो नशेत असल्याचे पाहून त्याच्याजवळ दोन तरूण आले. यातील एकाने दारूड्याचे हात पकडले तर दुसऱ्याने आधी खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. दारूडच्या चोर खिशात पैसे असल्याचे लक्षात आल्यानंतर संबधीताने चक्क ब्लेडने त्याचा खिसा कापून त्यातून पैसे काढत त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
माळीवाडा बसस्थानक परिसरातील माळीवाडा वेस या ठिकाणी भर रस्त्यावर हा प्रकार घडला. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनी याकडे दुलर्क्ष झाले. गुरूवारी ड्राय डे असतांना असा प्रकार घडल्याने इतर दिवशी या ठिकाणी काय परिस्थिती असेल, हे सांगायला नकोत. याच रस्त्यावरून दररोज शाळकरी, महाविद्यालयीन मुली, प्रवासी महिला, नोकरदार महिला प्रवास करत असताच त्यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. या परिसरात पोलिसांनी लक्ष देऊन दारूड्यांसह टारगटांचा बदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.