दिवसातून सात वेळा अवश्य पाणी प्या; अन्यथा होतील घातक परिणाम

पुणे – पाणी  (Drink water) शरीराला क्‍लिन करण्यासोबतच त्यांचे फंक्‍शनिंगही सुधारते. बॉडी हायड्रेड राहिल्याने आरोग्य नेहमी चांगले राहते. दिवसभरात सात अशा वेळा आहेत, जेव्हा शरीराला पाण्याची सर्वाधिक आवश्‍यकता असते. यावेळी पाणी अवश्‍य प्यायले पाहिजे.

सकाळी उठल्यानंतर
सकाळी उठल्यानंतर पाणी न पिणे  (Drink water) असेच आहे, जसे कारला झिरो टेम्परेचरमध्ये स्टार्ट करून इंजिन गरम न करताच गिअर टाकणे. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास थंड पाणी प्यायल्याने बॉडी ऍक्‍टीव्ह होते. याद्वारे शरीराला संकेत मिळतो की, आता ऍक्‍टीव्ह होण्याची वेळ आली आहे.

खाण्यापूर्वी

जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने  (Drink water) तुमचे पोट अगदीच रिकामे राहत नाही. ज्यामुळे तुम्ही जेवणही कमी करता. जेवणापूर्वी बॉडी हायड्रेट असल्यास जेवणही चांगले जाते.

वर्कआऊट करण्यापूर्वी व नंतर
वर्कआऊटपूर्वी पाणी प्यायल्याने तुमचे शरीर डिहायड्रेशनपासून वाचते. यामुळे वर्कआऊटपूर्वी किंवा या दरम्यान एक ग्लास पाणी प्यावे. तसेच वर्कआऊटनंतरही पाणी प्यावे (Drink water) . जेणेकरून शरीरातून लॉस झालेल्या पाण्याची भरपाई होऊ शकेल. मात्र, लक्षात ठेवा वर्कआऊटनंतर लगेचच भरपूर प्रमाणात पाणी पिऊ नये.

भूक लागल्यास
भूक लागल्यास एक ग्लास पाणी प्यावे (Drink water) . कारण, बऱ्याच जणांना केवळ तहान-भूक सारखीच वाटत असते.

आजारी असल्यास
आजारी असल्यास जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. तुम्हाला एकूण आश्‍चर्य वाटेल की, आजारी असताना पाणी प्यायल्याने तुम्ही लवकर बरे होता.

विषाणूग्रस्त ठिकाणी असाल, तर पाणी प्यावे  (Drink water)
जेव्हा तुम्ही हॉस्पिटल किंवा अशाच एखाद्या ठिकाणी जेथे भरपूर आजारी लोक असतील, अशा वेळेस एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीराला व्हायरस आणि विषाणूंना दूर ठेवण्याची क्षमता मिळते. एक वेळ हायड्रेड बॉडी व्हायरसला तुमच्या शरीरात सेटल होऊ देत नाही.

थकलेले असल्यास
तुम्हाला माहिती नसेल की, थकवा हा देखील एक डिहायड्रेशनचा संकेत आहे. पाणी  (Drink water) तुमच्या मेंदूपर्यंत जात तुमच्या शरीराला बुस्ट करते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.