प्या दारू, खा मटण, दाबा बटण

नेवासा  – निवडणूक काळात मतदारांना भूलविण्यासाठी कार्यकर्ते, उमेदवार, राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढविल्या जात आहेत. निवडणूक काळात मतदार राजा खुश राहून तो मतदानाच्या रूपाने आपल्यालाच पावला पाहिजे, यासाठी खा मटण… प्या दारू… आणि दाबा बटण ही योजना राबविण्यात येत असल्याची तालुक्‍यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे तळीरामांना आणि खवय्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणूक मोठी रंगतदार झाली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मात्र खरी भाजप-शिवसेना युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतच लढत आहे. राज्यात आपलीच सत्ता असावी, यासाठी दोन्हीही पक्षांनी उमेदवारांना चांगलीच ताकद दिली आहे. कार्यकर्ते देखील यासाठी कष्ट घेत आहेत.

काहीही झाले तरी चालेल पण सत्ता आपल्याच हातात असावी, यासाठी कार्यकर्ते व उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. निवडणूक म्हटलं की दारू, मटण, लक्ष्मीदर्शन आलेच, असे हल्लीच्या निवडणुकीचे सूत्र बनले आहे. मतदनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. मतदार राजाला खूश ठेवण्यासाठी गावागावांत वेगवेगळे प्रयोग सुरू झाल्याची चर्चा आहे. गावागावांत मटणाच्या पार्ट्यांना उत येऊ लागला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)