DRDOतील मनुष्यबळ ‘अपुरे’; संसदीय स्थायी समितीचा ‘निष्कर्ष’

नवी दिल्ली – संरक्षण आणि विकास क्षेत्रातील एक महत्वाची संस्था मानली जाणाऱ्या डीआरडीओ या संस्थेत सध्या अपुरे मनुष्यबळ असून त्यामुळे तेथील संशोधन कार्याला हे मनुष्यबळ पुरे पडत नसल्याचा निष्कर्ष संसदेच्या संरक्षण विभागाशी संबंधीत समितीने काढला आहे.

गेल्या वर्षीै अर्थमंत्रालयाने या संस्थेतील 436 जागा भरण्यास अनुमती दिली आहे. डीआरडीओ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य बांधकाम अभियंते या दोन नवीन वरीष्ठ पोस्ट तयार करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला होता.

पण त्यावर डीआरडीओने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची मान्यता घ्यावी अशी सूचना अर्थमंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाला केली आहे. डीआरडीओतील मनुष्यबळ वाढवण्याच्या संबंधात नेमकी काय उपाययोजना केली जात आहे याची माहिती सरकारच्या संबंधीत विभागांकडून या समितीला देण्यात आलेली नाही असेही समितीने नमूद केले आहे.

डीआरडीओ मध्ये वैज्ञानिकांची मंजुर पदे 7353 इतकी आहेत. पण आज त्या संस्थेत 7068 वैज्ञानिकच कार्यरत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.