संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञाला पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानी एजंटसोबत माहिती पुरवल्याचा आरोप आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सांगितले की, डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे शास्त्रज्ञ पुण्यातील डीआरडीओ शाखेत कार्यरत होते. तपासात व्हॉट्सअॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ आणि सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क उघड झाला.
एटीएसने सांगितले की, जबाबदार पदावर असतानाही डीआरडीओच्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर केला. संवेदनशील सरकारी माहिती लीक करून त्याने आपली जबाबदारी आणि देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली. अशी माहिती शत्रू राष्ट्राच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक काळाचौकी मुंबईने अधिकृत गुप्तता कायदा 1923 च्या कलम 1923 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अधिकारी करीत आहेत.