कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कार्यादेश काढा

पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश


मुंबईतील बैठकीत सहा योजनांबाबत आढावा

पिंपरी – पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. मावळ तालुक्‍यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधील कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

मंत्रालयात मावळ तालुक्‍यातील गावांमध्ये कार्यवाही सुरू असलेल्या सहा योजनांबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर, राजे निंबाळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता गजभिये यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, मावळ तालुक्‍यातील गावांसाठीच्या योजना नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्‍यक आहे. डोंगरगाव आणि कुसगाव गावात सुरू असलेल्या प्रादेशिक योजनेबाबतची निविदा काढणे आणि अन्य तीन प्रादेशिक योजनांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतचे आदेश प्राधान्याने देण्यात यावेत. देहूरोड आणि कॅंटोन्मेंट बोर्ड पाणीपुरवठा योजनेबाबत कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.