लाहोर – भारतीय संघाचा पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक बनलेल्या राहुल द्रविडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेद्वारे पहिल्याच मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
रवी शास्त्री यांच्याजागी नियुक्ती झाली असली तरी त्याला आता स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केले आहे.
एक फलंदाज म्हणून तो यशस्वी ठरला आहे मात्र, आता त्याला एक प्रशिक्षक म्हणूनही सिद्ध करावे लागणार आहे. केवळ मायदेशातील मालिका जिंकल्यावर तो यशस्वी प्रशिक्षक ठरणार नाही, असा टोलाही त्याने मारला आहे.