‘ड्रीम गर्ल’ची ‘इथे ही’ ड्रामेबाजी

नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती वर्षात संसदेतील परिसरामध्ये स्थापित महात्मा गांधी यांच्या समोरील परिसरात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तसेच खासदार हेमा मालिनी यांनी आज स्वच्छतेचा संकल्प घेतला. यावेळी केंद्रीय मंत्र्यासमावेत खासदार हेमा मालिनी आणि अनुराग ठाकूर यांनी परिसर स्वच्छ केला. मात्र यावरून हेमा मालिनी यांना नेटक-यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.


दरम्यान, परिसर साफ करतानाचा हेमा मालिनी यांचा व्हिडिओला नेटकऱ्यांनी म्हंटले की, मॅडम तुम्ही तुमच्या घर, संसद तसेच तुमच्या ऑफिसबाहेर निघून बघा तुम्हाला कचरा भरपूर दिसेल, असा खोचक सल्ला दिला आहे. तर हा व्हिडिओ पाहुन लक्षात येते की, ड्रीम गर्लने जीवनात कधीच झाडू हातात घेतला नाही, अशा शब्दात त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.