ड्रामा क्विन राखी सावंत दुसऱ्यांदा अडकणार लग्न बेडीत

मुंबई – बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ही नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता राखी पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती खुद्‌द राखीने दिली आहे. त्यामुळे तिचा होणार नवरा कोणता अभिनेता असणार अशा चर्चा रंगल्या आहेत. राखी नेहमी ती विवाहित असल्याचा दावा करत असते. तर मग तिचे लग्न झालेले असताना दुसऱ्यांदा ती कोणाशी लग्न करणार आहे, असा सर्व प्रेक्षकांना पडला आहे.

एका मुलाखतीदरम्यान राखी म्हणाली, राखी आणि रितेशचे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे होत असते. रितेशच्या विझामध्ये काहीतरी समस्या येत आहे आणि काही कायदेशीर गोष्टी आहेत ज्या तो पूर्ण करत आहे. यानंतर तो आमच्या नात्याबद्दल सर्वांसमोर बोलणार आहे.

राखीचे 2018 मध्ये रितेशसोबत लग्न झाले होते. त्यावेळी तिने लग्नातील तिचे काही फोटो शेअर केले होते. ज्यात ती वधूच्या गेटअपमध्ये मंडपात दिसत होती. मात्र या फोटोत तिचा नवरा दिसत नव्हता. राखीच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली असलीतरी अजूनही तिच्या नवऱ्याला कोणी पाहिले नाही.

राखीचा नवरा कधीही मीडियासमोर आला नाही. पण ती नेहमी माझे रितेशसोबत लग्न झाल्याचे सांगत असते. आता राखी पुन्हा सर्वांसमोर लग्न करत असल्याने तिचा नवरा रितेशचा चेहरा सर्वांच्या समोर येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.