नाटक हे नाटकच असते – जळकेकर

घोडेगाव – नाटक हे नाटक असत आणि वास्तव हे वास्तव असते. तेव्हा वास्तव स्वीकारा आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा लोकसभेत पाठवा, असे आवाहन जळगाव येथील हभप ज्ञानेश्‍वर पाटील-जळकेकर यांनी केले. घोडेगाव येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना-भाजप व आरपीआय यांची संयुक्‍त पदयात्रा व कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला अहिल्यादेवी चौक ते कुंभार गल्ली मार्गे, बाजारपेठेतून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मोठया संख्येने लोक सहभागी झाले होते.

यावेळी कल्पना आढळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, अलकाताई घोडेकर, शितल तोडकर, सुनिल बाणखेले, सुरेश भोर, अरुण गिरे, शिवाजीराव ढोबळे, बी. डी. आढळराव पाटील, तुकाराम काळे, प्रशांत काळे, मिलींद काळे, राजाभाऊ काळे, बबनराव गव्हाणे, लक्ष्मणशेठ काचोळे, शशि बाणखिले, शिवाजी राजगुरू, अनिता आढारी, राजेश्‍वरी काळे तसेच भाजप तालुका अध्यक्ष संजय थोरात, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, संजय नांगरे, धनंजय कोकणे, राजेश काळे आदी उपस्थित होते.

जळकेकर म्हणाले, शिवसेनेची फौज कोणी पैशाने विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने कितीही जोर लावला तरी खासदार आढळरावांचा विजय निश्‍चित आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार शुटींगसाठी 2-2 दिवस गायब असतो. जर आत्ताच हा गायब होऊ लागला तर निवडून झाल्यावर भेटायचा कधी? प्रत्येक वेळी भेटायला मुंबईला जावे लागेल.

आढळराव पाटील गेली 15 वर्षे शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची सेवा करत आहेत. खासदार आढळराव सामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणुसच लोकसभेत जाणे गरजेचे आहे, आढळरावांसारखा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणुसच लोकसभेत जाणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी अरुण गिरे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.