ड्रेनेज फुटल्याने मैलामिश्रित पाणी थेट पवनेत 

सांगवीत दुर्गंधीयुक्‍त पाणी नदीपात्रात : घाणीच्या साम्राज्याने नागरिक हैराण

पिंपळे गुरव  – नवी सांगवी, पिंपळे गुरव व जुनी सांगवीतील नर्मदा गार्डन मागील बाजूस म्हणजे दशक्रिया घाटाजवळ चेंबरचे मलमिश्रित पाणी थेट नदी पात्रात सोडले जात आहे.

एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहेत हेच कळत नाही. तसेच नवी सांगवी, पिंपळे गुरव, जुनी सांगवी या भागाला जोडणारी पवना नदी हे मैलामिश्रित पाणी जात आहे.

काही दिवसांपूर्वी नदी घाटाजवळील चेंबर फुटल्याने नर्मदा गार्डनमागे बाजूस परिसरातील ड्रेनेजमधील घाण पाणी नदी पात्रात जात आहे, असे घाण पाणी नदीपात्रात गेल्याने प्रदूषणात भर पडत आहे. एकीकडे नागरिकांनी नदीचे प्रदूषण टाळावे. चेंबर फुटून नदी प्रदूषण वाढत आहे, मात्र याकडे पालिकेच्या अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करीत आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर नदीतील प्रदूषणाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. प्रदूषित पाण्यात गणपती विसर्जन करायचे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवी सांगवी व जुनी सांगवी परिसरातून नागरीक येतात. पण घाण पाण्यामुळे नदी किनारी उभे राहणे मुश्‍किल झाले आहे. दशक्रिया घाटावर येणाऱ्या नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्यामुळे दुर्गंधी येते. यामुळे श्‍वसनाचे विकार वाढायची शक्‍यता आहे. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही लवकर लवकर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे ही चेंबर तुटल्यामुळे घाण पाणी थेट नदीपात्रात जात आहे.

नवी सांगवी, पिंपळे गुरव, जुनी सांगवीत नर्मदा गार्डन मागे दशक्रिया घाटाजवळ ड्रेनेजचे मलमिश्रित पाणी लाखो लीटर पवना नदीत मिसळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चेंबरची पाहणी करून ती दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.