अमेरिकेचे “ड्रॅगन फ्रूट’ आता आढळा परिसरात… तुम्हीही घेऊ शकता उत्पादन 

खर्च कमी, मागणी जास्त असल्याने लागवड वाढणार 
प्रा. डी. के. वैद्य 
औषधी आणि पंचतारांकित फळ 
कमीतकमी पाणी आणि हलक्‍या जमीनीतील या फळाला मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि गोव्याच्या पंचतारांकित हॉंटेलात चांगली मागणी आहे. आंतराष्ट्रीय विक्रीचे हे फळ मधुमेह नियंत्रित करते. शरीरातील हानिकारक कोलेस्टोरॉंल कमी होण्यास मदत होते.संधिवात आणि दम्यावरही हे प्रभावी गुणकारक आहे. 
डाळिंबाला होतोय सक्षम पर्याय 
महाराष्ट्रातही ड्रॅंगन फ्रूटचे उत्पादन 
ड्रॅंगन फ्रूटची जन्मभूमी दक्षिण मध्य अमेरिका असली तरी व्हीएतनाम, थायलंड, मलेशिया, इस्रायल, फिलीपिन्स, श्रीलंका या देशात मोठी लागवड होते.आपल्याकडेही महाराष्ट्र, तेलंगना, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या सर्व ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही शेती उभी आहे. 
अकोले, दि. 29 – निवडूंग वनस्पती वर्गातल्या आणि दक्षिणमध्य अमेरिकेत मुळ असणाऱ्या ड्रॅंगन फ्रूट लागवडीचा प्रयोग अकोले तालुक्‍यातील वीरगावला यशस्वी झाला आहे. वीरगावच्या सचिन वाकचौरे यांनी या फळाला पहिल्यांदा आढळा परिसरात आणून बाजारपेठेची वाट दाखविली. या भागातील शेती तशी मोठ्या प्रमाणावर डाळींबाची आहे. अनेक दिवस या पिकाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लावला. डाळींबाची शेती वाढली तशी रोगराई वाढली. तेल्या आणि मर रोगाने डाळींब शेती उध्वस्त झाली. उत्पादन खर्च वाढला आणि बाजारभाव बेभरवशाचे झाले. त्यामुळे डाळींब उत्पादक वैतागले. डाळींबाच्या तुलनेत अत्यल्प पाणी, रोगाचा प्रादुर्भाव नाही आणि शाश्‍वत उत्पन्नाची खात्री यामुळेच ड्रॅंगन फ्रूट आता या भागात पाय रोवत आहे.
समशितोष्ण वातावरणाचे या फळाला आपलेकडे पोषक वातावरण आहे. ढगाळ वातावरणात याची वाढ चांगली होत असली,तरी नंतर स्वच्छ सूर्यप्रकाश हवा.वालुकामय आणि चांगली निचरा असलेली जमीन ड्रॅंगन फ्रूटसाठी उपयुक्त आहे. 
– सचिन भाऊसाहेब वाकचौरे ड्रॅंगन फ्रूट उत्पादक, (वीरगाव,ता.अकोले) 
सचिन वाकचौरे यांनी सध्या दीड एकरात ड्रॅंगन फ्रूटची लागवड केली आहे. एका पोलवर चार अशी साधारण 2 हजार 600 झाडे त्यांनी शेतात लावली आहेत. फळांची पहिली तोडणी त्यांनी केली आणि फळविक्रीच्या श्रीगणशेला त्यांना प्रतिकिलो 125 रुपये बाजारभाव मिळाला. वाकचौरे यांनी ही रोपे मालेगाव येथून आणून लागवड केली. मशागतीपासून ते फळाच्या तोडणीपर्यंत त्यांना दीड एकरात साडेतीन लाख रुपये खर्च आला. पहिल्या वर्षी उत्पन्न कमी मिळाले तरी या फळझाडांचे 20 ते 25 वर्ष इतक्‍या दीर्घ आयुर्मानात उत्पादन प्रतिवर्षी वाढत जाणार असल्याचे वाकचौरे म्हणाले.
हे जैविक फळ असून त्यावर रोगराईचा प्रादुर्भाव होत नाही. आगामी काळात एका पोलवर असलेल्या झाडापासून 50 ते 60 किलो उत्पादन मिळेल. 150 ते 250 रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव सातत्याने असतोच. बाजारभाव कमीच झाले तरीदेखील 100 रुपये प्रतिकिलोच्या आत हे फळ विकलेच जात नाही अशी माहिती वाकचौरे यांनी दिली.
आढळा परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळींब शेती उभी आहे.परंतू उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव स्थिर नाहीत. शिवाय डाळींब विक्रीत स्थानिक दलाल आणि व्यापारी यांचेकडूनही मोठी लूटमार सुरु असते.त्यामूळे भविष्यात डाळींब उत्पादक हा ड्रॅंगन फ्रूटचा उत्पादक होण्याच्या मार्गावर आहे. आढळेच्या एकूण खोऱ्यात सध्यातरी पाच एकर इतक्‍या अत्यल्प क्षेत्रावर उभे असलेल्या ड्रॅंगन फ्रूटने आगामी काळात संपूर्ण खोरे व्यापले तर नवल वाटायला नको.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)