पिंपरी – महापालिकेच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मानधन तत्वावर अधिष्ठातापदी नेमणूक असलेले डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडील वित्तीय व प्रशासकीय अधिकार सोपविले आहेत. या अधिकारांमुळे एखादी चुकीची घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका आयुक्त स्वीकारणार का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. वाबळे यांचे हे सर्व अधिकार तत्काळ काढून घेण्याची मागणी वाघेरे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या इतिहासात ही बाब प्रथमच होत आहे. त्यामुळे वाबळे यांच्याकडील सर्व अधिकार तत्काळ काढून घेण्याची मागणी केली आहे.