‘या’ लसीला मानवी चाचण्यांची मान्यता

नवी दिल्ली  – डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीकडून विकसित केल्या जाणाऱ्या कोविड-19 विरोधी “स्पुटनिक 5′ या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी रशियातील “रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड’ आणि भारतातील औषध नियंत्रकांकडून मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यातील चाचणीमध्ये सुरक्षितता आणि प्रतिकारशक्‍ती संदर्भातील तपासणी केली जाणार आहे, असे डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतातील वैद्यकीय चाचण्या आणि त्याच्याशी संबंधित अर्थकारणाशी या टप्प्यातील चाचण्या संबंधित आहेत. साथीचा प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे रेड्डीज लॅबोरेटरीजचे सह-अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जी. व्ही. प्रसाद म्हणाले. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीबरोबर सहकार्य केल्याबद्दल “आरडीआयएफ’नेही समाधान व्यक्‍त केले आहे.

भारतातील वैद्यकीय चाचण्यांबरोबरच रशियाच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्याही केल्या जातील. यामुळेच “स्पुटनिक-5’चा भारतातील क्ष्मता अधिक सिद्ध केली जाईल, असेही प्रसाद यांनी संगितले.

रशियातील गमलेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजी रपवण्ड मायक्रोबायोलॉजी द्वारा विकसित केलेली स्पुटनिक-5 लस 11 ऑगस्ट रोजी रशियातील्‌ आरोग्य मंत्रालयाने कोविड विरोधातील पहिली लस म्हणून नोंद केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.