नवी दिल्ली – रशियातून आलेल्या स्पुतनिक या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. भारतात ही लस 948 रुपयात मिळणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्टॉक एक्सचेंजला स्पुतनिकच्या डोसच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहे. या कंपनीने या लसीच्या एका डोससाठी 948 रुपये ठेवली आहे. त्यावर 5 टक्के जीएसटी लागणार असल्याने एका डोसला हजार रुपये पडणार आहेत.
रेड्डीज लॅबने या व्हॅक्सिनची सॉफ्ट लॉन्चिंग करताना शुक्रवारी हैदराबादमधील एका व्यक्तीला या लसीचा पहिला डोस दिला. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. तसेच या लसीला 13 मे रोजी सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरीने मंजुरी दिली आहे. या लसीची आणखी एक खेप आयात केली जाणार असून त्यानंतर या लसीची जूनपासून भारतातच निर्मिती केली जाणार आहे.
भारतात या लसीची निर्मिती झाल्यास त्याची किंमत कमी होईल. भारतात सहा लसी तयार करणाऱ्या कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, निती आयोगाच्या एका सदस्याने डिसेंबरपर्यंत देशात कोविड व्हॅक्सिनेच 200 कोटीहून अधिक डोस भारताला उपलब्ध होतील असा दावा कलेा आहे.