सांगवी – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महा-विद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. नितीन घोरपडे यांची बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयातून बदली होऊन बाबुरावजी घोलप महाविद्यालयात रुजू झाले आहेत.
डॉ. घोरपडे यांना अध्यापनाचा सतरा वर्षे व प्राचार्य पदाचा अकरा वर्षे अनुभव आहे. त्यांनी तीन वेळा अभ्यास मंडळ सदस्य, दोन वेळा अध्यक्ष, दोन वेळा विभाग सदस्य, दोन वेळा आर. आर. समिती सदस्य, दोन वेळा विद्या परिषद सदस्य, बीसीयुडी उपसमिती सदस्य अशा विद्यापीठ अधिकार मंडळावर विविध समित्यांवर काम केले आहे.
त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत बॅंकॉक, सिंगापूर, स्पेन, इराण, ओमन, बारसिलोना तसेच राष्ट्रीय परिषदेत संशोधन पेपर सादर केले आहेत.
त्यांनी युजीसी लिस्टेड जर्नलस, वर्कशॉपसमध्ये शंभरहून अधिक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ संशोधक विद्यार्थ्यांनी एम. फील, तर पाच विद्यार्थ्यांना पी. एच. डी. जाहीर झाली असून, चार विद्यार्थी एम. फील, तर पाच विद्यार्थ्यां पी. एच. डी. संशोधन करीत आहेत.