यंदा नेरळमध्ये होणार ‘काव्य जागर’

पिंपरी – पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य, कला अकादमीच्या वतीने नेरळ येथे काव्यजागर संमेलन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरुषोत्तम सदाफुले यांनी पिंपरी येथे दिली.

नेरळ येथील स्वानंद सोसायटीमध्ये बुधवार (दि.1) मे रोजी हे काव्यजागर संमेलन होणार आहे. उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य समन्वयक सचिन इटकर असणार आहेत. यावेळी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, जय भवानी उद्योग समूहाचे संचालक रंगनाथ गोडगे पाटील, कार्यवाह उध्दव कानडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद आवटे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश वसतकर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार कविवर्य अशोक बागवे, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार कृपेश महाजन, धनाजी घोरपडे, ज्योत्स्ना चांदगुडे, समृध्दी सुर्वे, अशोक कोठारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच काव्य मैफल आयोजित केली आहे. या मैफलीचे अध्यक्ष रवी पाईक असणार आहेत. तर पितांबर लोहार, इंद्रजीत घुले, अनंत राऊत, मानसी चिटणीस, राजेंद्र वाघ यांचा या काव्यमैफलीत समावेश असणार आहे. काव्यमैफलीचे सूत्रसंचालन कवी भरत दौंडकर करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.