विमान दुर्घटनेतील कुटुंबियांना मसालाकिंग डॉ. दातार देणार 20 लाखांचा निधी

पुणे – एअर इंडियाचे दुबईहून आलेले विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर घसरुन अलिकडेच झालेल्या दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह 18 जण मृत्यूमुखी पडले. या मृतांच्या वारसांना वैयक्तिक साह्य म्हणून अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार त्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत 20 लाख रुपयांचा निधी देणार आहेत.

यासंदर्भात बोलताना डॉ. दातार म्हणाले, या दुर्दैवी विमान फेरीतील अनेक प्रवासी असे होते ज्यांनी परदेशातील त्यांचे रोजगार गमावले होते. अनेकजण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी वैयक्तिकरीत्या हा पुढाकार घेतला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.