डॉ. मनमोहनसिंग यांनी घेतली राज्यसभेची शपथ

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांना अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, गुलामनबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा इत्यादी उपस्थित होते.

अध्यक्ष नायडू यांच्या केबिन मध्येच हा शपथविधी झाला. मनमोहनसिंग हे राजस्थानातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही यावेळी उपस्थित होते. 86 वर्षीय मनमोहनसिंग यांची आधीची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत गेल्या 14 जुनला संपली होती. त्यावेळी ते आसाममधून निवडून आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.