कोल्हापूर –आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी हे 24 तास कामामध्ये असायचे त्यांची ही उर्जा आंम्हाला प्रेरणादारी आहे असा सूर रविवारी मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या निरोप समारंभ प्रसंगी कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. सदरचा सोहळा महापालिकेच्या राजषीर् छ. शाहू सभागृहता पार पडला. यावेळी नुतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचे स्वागतही करण्यात आले.
अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई म्हणाले मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांच्यामध्ये असलेजी उर्जा आंम्हाला प्रेरणादायी आहे. ते रात्री 12 वाजेपर्यंत फोनवरुन सूचना देत असत आणि सकाळीही लवकर उठून काममध्ये असत. ते कोणत्याही कामाबाबत पॉझिटीव्ह उत्तर देत असत. त्यांनी पूरकालावधी व कोरोना कालावधीमध्ये महापालिकेच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडू दिला नाही. त्यांनी आपत्ती व्यावस्थापन, जिल्हा नियोजन व सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांचे सहकार्य घेतले. त्यामुळे महापालिका या आपत्तीच्या कालावधीत कोठेही कमी पडली नाही. नुतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनाही आमचे सर्वांचे सहकार्य राहील.
उप आयुक्त निखील मोरे म्हणाले मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संत गाडगेबाब नागरी स्वच्छता अभियान राज्यात राबविले. त्यांना याबाबत जास्त माहिती होती. लॉकडाऊनमध्ये बेघर असलेल्या लोकांच्यासाठी राहण्यासाठी सोय केली. आयसोलेशन हॉस्पीटील भविष्यात कायमस्वरुपी वापरता येईल या पध्दतीने तयार केले. स्वच्छता उपक्रम चालू केला. सदरच्या उपक्रमाचा आजचा 76 वा रविवार असून 100 व्या स्वच्छता माहितेस त्यांना पुन्हा आमंत्रित केले जाईल. त्यांनी त्या मोहिमेस उपस्थित राहून मार्गदर्शन करावे.
यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, प्रशासनाधिकारी शंकर यादव, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, उप-शहर अभियंता बाबुराव दबडे, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, के.एम.टी.चे कामगार अधिकारी संजय इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी बोलताना कोल्हापूर शहराशी माझे फार जवळचे नाते आहे. माझे शिक्षण शिक्षण शिवाजी विदयापीठात झाले. शिवाजी विदयापिठात नेतृत्व गुण मिळाले त्याच शहरात मला महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याची चांगली संधी मिळाली. मी त्या काळात के.एम.टी.व एस्टीने प्रवास केलेला आहे. माझ्या कालावधीत शाहू समाधीस्थळाचे एक चांगले काम झालेले आहे.
आयसोलेशन हॉस्पीटलचा कायापालट लोकसहभागातून केला आहे. आयुक्त पदाच्या कार्यकिर्दीत स्वच्छता, आरोग्य या दोन गोष्टींना प्राधान्य देऊन स्वच्छता मोहिम गतीमान ठेवली. त्यामुळे जयंती नाला नदीत रुपांतर होऊन आरोग्य स्वच्छता आणि पर्यावरण पूरक बनविला. स्वच्छतेच्या अमृत महोत्सवी लोकत्सोवानिमित्त सारं कोल्हापूर रस्त्यावर एकवटलं ! निमित्त होतं महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या महास्वच्छता अभियानाच्या 75 व्या आठवडयाचं. याकामी अबाल, बृदांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. पंचगंगा प्रदूषण, झोपडपट्टी व दाटवस्तीच्या ठिकाणी, वैयक्तित शौचालय, बागांचे सुशोभीकरण अशा अनेक गोष्टी मार्गी लागल्याबददल मला समाधान आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज माझे श्रध्दास्थान असून त्यांच्या आदर्श विचारानुसार मी वाटचाल केली.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह पालकमंत्री, महापौर, लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविकांनी मला सक्रिय पाठिंबा देऊन माझ्या कामाला साथ दिली. त्यामुळेच महापूर आणि कोरोनाच्या संकटामधून मार्ग काढणे शक्य झाले. कोरोनाच्या काळात कोल्हापूरच्या जनतेच्या उत्स्फुर्त लोकसहभागातून महापालिकेला मोठी मदत केली आहे. कोल्हापूरातील सर्व नागरीक, कृती समित्या अशा सर्वांनीच मला विधायक कामाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
माझ्या कालावधीत जयंती नदी प्रदुषण मुक्त, झुम प्रकल्प, महापालिकेच्या शाळा चांगल्या करण्यावर मी भर दिला. महापालिकेची शाळा ही पहिला ऑनलाईन शिक्षण देणारी शाळा आहे. ही महापालिका आपली आहे असे समजून सर्वांनी प्रामाणिक पणाने काम करावे. येथे काम करताना मला लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, इले. मिडिया व शहरवासियांनी चांगले सहकार्य केलेले आहे. कोल्हापूरच्या जनतेने दिलेले प्रेम मी कधीही विसरु शकणार नाही.
माझे आयुक्त पदाच्या कालावधीत मी लोकांच्या सेवेसाठी गुंतून राहिलो. कोल्हापूर एक दिवसही सोडले नाही वा सुटटी घेतली नाही. महानगरपालिका आणि कोल्हापूरचे नागरीक यांचे हित डोळयासमोर ठेवूनच मी माझ्या कार्यकाळात पारदर्शी लोकाभिमूख कामकाज केले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून सेवा करण्याची फार मोठी संधी मला मिळाली असून आयुक्त म्हणून केलेल्या कामाबददल मी पूर्ण समाधानी आहे अशी प्रतिक्रिया मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी व्यक्त केली.
महानगरपालिका सर्व क्षेत्रामध्येअग्रेसर ठेवू – नुतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे
नुतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या मला शहराच्या विकास करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. जसे मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांना आपण सर्वांनी सहकार्य केले तसेच मलाही सहकार्य करावे. अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे शहराच्या दृष्टीने काही नवीन संकल्पना असतील तर मला न डगमगता सांगा आपन नक्कीच ती संकल्पना राबवू. महानगरपालिका सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 यावी यासाठी मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सर्वजन मिळून चांगले काम करायचे आहे. मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी जे उपक्रम हाती घेतलेले आहेत ते सर्व उपक्रम पुढे चालू राहतील.
मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांचा सत्कार नुतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीची चांदीची मुर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तर नुतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, आरोग्यधिकारी डॉ.अशोक पोळ, जल अभियंता भास्कर कुंभार, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, रावसाहेब चव्हाण, कार्यकारी अभियंता नारायण भोसले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी अधिकारी, पर्यावरण अभियंता समीर व्यांघ्राबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजिच चिले, नगरसचिव सुनिल बिद्रे, प्रॉ.फंड अधिक्षक उमाकांत कांबळे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.