डॉ. धनंजय दातार यांनी राखली देशाची प्रतिष्ठा

सौदी अरेबियात अडकलेल्या भारतीय कामगारांची सुटका

पुणे – मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग समूहाने सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेली चार महिने तुरुंगवासात अडकलेल्या भारतीय कामगारांची सुटका केली. हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, त्यांनी डॉ. दातार हे अल अदील (भला माणूस) आहेत, या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

जेद्दाह शहरात कामासाठी गेलेले हे भारतीय कामगार करोना व लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले होते. काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती.

तर काहींच्या नोकऱ्या गमावल्याने ते अन्यत्र मिळेल ते काम करून गुजराण करत होते. तर काहीजण अक्षरशः भीक मागत होते. या गोष्टी स्थानिक कायद्याला धरून नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात केली होती.

डॉ. धनंजय दातार यांना हे समजताच त्यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि स्थानिक प्रशासनाने मानवतावादी भूमिकेतून या निरपराध कामगारांना तुरुंगवासातून सोडल्यास सर्वांना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.