पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलळकर यांच्या हत्या प्रकरणातील संशियित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला आहे.
या अर्जावर सोमवारी (दि.13) सीबीआय म्हणणे सादर करणार आहे. त्यानुसार पुढील सुनावणी होईल, अशी माहिती डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली.
दरम्यान ऍड. पुनाळेकर यांनी या गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. जामीन अर्जासह भावे याने देखील या गुन्ह्यातून वगळण्यासाठी अर्ज केला आहे.