मंचर -शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्यावर गुरुवार (दि.11) मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
माजी सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले, औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यावरुन कोल्हे यांनी केवळ नामकरण केल्याने काय साध्य होणार आहे.अशी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना जनतेने टोल केले होते. त्यातच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला राज्याची मंजुरी मिळाल्याने डॉ. कोल्हे यांनी श्रेयासाठी केलेल्या प्रयत्नांना सोशल मीडियावर लोकांनी जबरदस्त टोल करीत कामाचे श्रेय आढळराव-पाटील यांना दिल्याने खासदार कोल्हे यांचे मानसिक संतुलन बिघडले.
त्यांनी त्यांचा सख्खा भाऊ सागर रामसिंग कोल्हे याच्याकडून आढळराव पाटील यांची बदनामी सोशल मिडीयाद्वारे सुरू केली आहे. सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आढळराव पाटील यांची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा गांजाळे यांनी दिला.