नगर -सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अमित बडवे, सचिवपदी सहेजकौर वधवा तर खजिनदारपदी सुधीर लांडगे यांची निवड करण्यात आली.
लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. क्लबचे 210 देशामध्ये 15 लाख सभासदांच्या माध्यामातून सामाजिक कार्य चालू आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने शहरात नेत्रदान, रक्तदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आनण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, क्लबच्या माध्यमातून सामाजिक उद्दीष्ट समोर ठेऊन वर्षभर कार्य करणार असल्याची माहिती नुतन अध्यक्ष डॉ. अमित बडवे यांनी दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. बडवे अस्थिरोग तज्ञ असून, श्रीदीप हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची सेवा सुरु आहे. गरजू रुग्णांसाठी विविध शिबीर घेऊन ते मोफत सेवा देत असतात.
सचिव सहेजकौर वधवा मागील दहा वर्षापासून लायन्सच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे. खजिनदार सुधीर लांडगे औषधांचे वितरक म्हणून कार्यरत आहेत.