डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा
पुणे – इनकम टॅक्स व विक्रम पिल्ले ऍकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल ऍकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इनकम टॅक्स, पुणे संघाने सुपर इलेव्हन संघाचा 5-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून नितीन कुमार, आशुतोष लिंगेश, शिवदीप, सोनु दलाल आणि आशिष छेत्ती यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
विक्रम पिल्ले ऍकॅडमी अ संघाने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाचा पेनल्टी शुट आऊटमध्ये 4-3 असा पराभव केला. पिल्ले ऍकॅडमी संघाकडून रूबेन केदारी व देवेंद्र वाल्मिक आणि शुभम चावरे यांनी गोल करून संघाचा विजय सोपा केला.
सविस्तर निकाल : उपांत्य फेरी :
इनकम टॅक्स, पुणेः 5 (नितीन कुमार 12 मि., आशुतोष लिंगेश 22 मि., शिवदीप 26 मि.; सोनु दलाल 42 मि., आशिष छेत्ती 53 मि.) वि.वि. सुपर इलेव्हनः 0; हाफ टाईमः 3-0;
विक्रम पिल्ले ऍकॅडमी अः 2, 2 (रूबेन केदारी 18 मि., देवेंद्र वाल्मिक 37 मि., देवेंद्र वाल्मिकी, शुभम चावरे) वि.वि. फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः 2, 1 (वैंकटेश देवकर 25 मि., रोहन देवकर 36 मि., प्रवित नाईक); हाफ टाईमः 1-1;