पुणे – ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक, पत्रकार, मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख ‘डॉ. अनिल अवचट’ यांचे आज (दि. 27) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. डॉ. अनिल अवचट यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अनिल अवचट आणि त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्या सोबत ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती’ केंद्राची स्थापना केली. तसेच, ओळीगामीच्या प्रसारासाठी सुद्धा अवचट यांनी विशेष कार्य केले. दरम्यान, आता त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.
1969 साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (2021) मसाप जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.