वाघोली: संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाघोली तालुका हवेली येथील राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांनी संपूर्ण वाघोली गावासाठी covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जास्तीत जास्त वेगाने लस उपलब्ध करून राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे त्वरित होण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेस दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्धार केला असून या उपक्रमाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या उपक्रमाबद्दल राजेंद्र सातव पाटील कौतुक यांचे केले आहे.
सध्या covid-19 यांचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत असताना केवळ covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण हे त्याच्यावर अतिशय प्रभावी उपाय म्हणून ओळखले जात असून नागरिक देखील आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागल्याने ग्रामीण भागामध्ये लसीकरण वेगाने होऊन नागरिक covid-19 मुक्त होणे काळाची गरज असल्याने वाघोली तालुका हवेली येथील माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांनी पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या लोकसंख्येने जास्त असणाऱ्या गावासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक (बापू) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली या गावासाठी लसीकरणाची मोहीम अधिक सक्षम होण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती.
वाघोली हे पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून ओळख निर्माण केलेले जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे गाव असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाड्या-वस्त्या तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या नागरिकांना covid-19 चे प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने होऊन covid-19 मुक्त वातावरण निर्मिती होण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने संपूर्ण वाघोली मधील सर्व नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे होण्यासाठी व जास्तीत जास्त लस उपलब्ध होऊन लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांनी दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्धार केला आहे.
वाघोली मधील लसीकरणासाठी दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्धाराचे पत्र राजेंद्र सातव पाटील यांनी लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले . याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील ( गवळी), वाघोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवदास उबाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड,ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दानशूर व्यक्तींनी राजेंद्र सातव पाटील यांच्याप्रमाणे covid-19 मुक्तीच्या मोहिमेत मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले आहे.
सातव पाटलांच्या मदतीचे पर्व सुरूच….
वाघोली तालुका हवेली येथे मागील वर्षी covid-19 वाढत्या प्रादुर्भावाचा काळात कामगार, मजूर यांना मोफत अन्नदानाच्या उपक्रमासाठी राजेंद्र सातव पाटील परिवाराने आर्थिक मदत केली होती. या शिवाय भागातील गरजू नागरिकांना स्वखर्चाने अन्नधान्य किट देखील वाटप केले होते. शेतकऱ्यांच्या शेतातून भाजीपाला जागेवर खरेदी करून शासनाच्या नियमांना अधीन राहून सातव पाटील यांच्या परिवाराने वाघोली मधील नागरिकांसाठी घरपोच मोफत भाजीपाला वाटप उपक्रम देखील राबवला होता.
मागील वर्षी देखील सातव पाटील यांनी जवळपास पंधरा लाख रुपयांची मदत ही आपल्या भागातील नागरिकांसाठी केली होती. याही वर्षी सातव पाटील यांनी लसीकरणासाठी दहा लाख रुपयांची मदत करण्याचा निर्धार केला असून या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल सातव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.