आता मोबाईल नंबरच्या नोंदणीशिवाय आधार कार्ड डाउनलोड करा! हा आहे सर्वात सोपा मार्ग…

पुणे – आपल्याकडे अशी अनेक कागदपत्रे असतात, जी आता खूप महत्वाची असतात. उदा. आधार कार्ड. पूर्वी जवळपास सर्वच कामांसाठी मतदार ओळखपत्राला प्राधान्य दिले जात होते, पण आता त्याची जागा आधार कार्डने घेतली आहे. 

आधार कार्ड बनवल्यानंतर, ते तुमच्या नोंदणीकृत कार्डापर्यंत पोहोचते, ज्यात थोडा वेळ लागतो. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इंटरनेटवर जाऊन आधार कार्ड वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता. परंतु यामध्ये अनेक समस्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे मोबाईल क्रमांकाची नोंदणी. 

कारण नोंदणीकृत क्रमांकाशिवाय आधार डाउनलोड करता येत नाही. पण आता तुम्हाला त्याची गरज भासणार नाही, कारण भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली आहे. चला तर, मोबाईल क्रमांकाशिवाय आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू.

* ही आहे सोपी प्रक्रिया –

स्टेप १ : प्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि नंतर ‘माझे आधार’ वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला त्यात तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल किंवा तुम्ही तुमचा 16 अंकी आभासी ओळख क्रमांक देखील प्रविष्ट करू शकता.

स्टेप २ : आता तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर तुम्हाला ‘माझा मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल (तुमचा मोबाईल आधारशी जोडलेला नसेल, तरच हा पर्याय निवडा).

स्टेप ३ : यानंतर तो तुम्हाला मोबाईल नंबर (पर्यायी क्रमांक किंवा नोंदणीकृत नसलेला मोबाईल) विचारेल. जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर एटीपी (वन टाइम पासवर्ड) एंटर केलेल्या नंबरवर येईल. त्यानंतर तुम्हाला OTP भरावा लागेल आणि ‘नियम आणि अटी’ चेकबॉक्सवर क्लिक करा आणि नंतर सबमिट करा.

स्टेप ४ : यानंतर तुम्ही एका नवीन पानावर जाल, जिथे तुम्हाला पुनर्मुद्रणाच्या सत्यापनासाठी (रीप्रिंटिंग व्हेरिफिकेशन) आधार पत्राचे पूर्वावलोकन करण्याचा पर्याय मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला ‘मेक पेमेंट’ चा पर्याय निवडावा लागेल, जिथे तुम्ही पैसे भरून तुमचे आधार मागू शकता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.