मुंबई – देशभरात करोनाचे निर्बंध कमी होते असल्यामुळे उमेद वाढू लागली आहे. देशातील सात मोठ्या शहरात दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जूलै ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या घराच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली.
त्याचबरोबर मागणी वाढू लागलमुळे या काळीत या सात शहरातील घरांचे दर 3 टक्क्यांनी वाढल्याची माहीती एका अहवालात देण्यात आली आहे.सात शहरातील घराच्या विक्रीचा आणि दराचा आढावा घेऊन ऍनॉरॉक या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालातील माहीतीनुसार या काळता या शहरात 62 हजार घरांची विक्री झाली.
गेल्या वर्षी या कालावधीत देशात करोनामुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी केवळ 29,500 इतक्या घरांची विक्री झाली होती. त्या अगोदरच्या वर्षी म्हणजे करोना नसतांना या सात शहरात 24,560 इतक्या घरांची विक्री झाली होती. त्यामुळे आता रिऍल्टी क्षेत्रातील परिस्थिती खात्रीने सुधारत असल्याचे समजले जाऊ लागले आहे.
पुणे, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्ता, बंगळूरू, हैदराबाद या शहरातील माहीतीचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या काळात या शहरातील घरांच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत या शहरातील घरांचे दर 5,600 रुपये प्रती वर्ग फूट होते. ते आता 5,760 रुपये प्रती वर्ग फूट इतके झाले आहेत.
आता घराची विक्री का वाढत आहे व घरांच्या दराता का वाढ होत आहे, याबद्धल बोलतांना ऍनॉरॉक या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार वाढत आहेत. त्याचबरोबर या क्षेत्रातील पगारावर परिणाम झालेला नाही. त्यामुळे या क्षेत्रातील युवक घर घेत आहेत.
सरकारने घरांची विक्री वाढावी याकरीता बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. या काळात बॅकांनी घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत. त्यामुळे ज्यांची क्षमता आहे, असे लोक घर खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत. घरातून काम करण्याची पध्दत बऱ्याचा क्षेत्रात सुरु झाली आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचा प्रयत्न बरेच लोक करीत असल्याचे दिसून येत आहे.
बऱ्याच लोकांनी लस घेतली आहे. त्यामुळे घर विकणाऱ्यांना व घर खरेदी करणाऱ्यांना परस्पराशी संपर्क साधणे सोपे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील घर विक्री 4,850 वरून 100 टक्क्यानी वाढून 9,705 इतकी झाली आहे. मुंबईतील घर विक्री दुपटीने वाढून 20,965 इतकी झाली आहे.
या काळात दिल्लीतील घर विक्री 97 टक्क्यांनी, हैदराबाद शहरातील घर विक्री साडेचार पटिंनी, चेन्नईतीतील विक्री दुपटीने व कोलकात्ता शहरातील घर विक्री 100 टक्क्यांनी वाढली आहे.गेल्या वर्षी या काळात या सात शहरात 32,530 इतक्या घरांच्या नव्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. आता 64,560 इतक्या घरांच्या नव्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.