“सिया-जिया’मध्ये तापसी पन्नू साकारणार डबल रोल

बॉलिवुड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या आगामी “सिया-जिया’ चित्रपटात डबल रोल साकारणार आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध दिग्दर्शन संजय लीला भंसाली हे प्रड्यूस करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी करण्यात येणार आहे.
या चित्रपटात तापसी डबल रोल साकारत असून हा तिचा डबल रोल असलेला पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट खूपच मनोरंजक आणि वेगळया धाटनीचा असणार आहे.

या चित्रपटाचे शुटिंग लवकर होण्याची शक्‍यता आहे. या चित्रपटाची निर्मिती भंसाली प्रॉडक्‍शंसच्या बॅनरअंतर्गत करण्यात येणार आहे. याशिवाय शबीना खान या को-प्रड्यूस म्हणून काम पाहणार आहेत. या जोडीने यापूर्वी 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या “रावडी राठोड’ हा चित्रपट प्रड्यूस केला होता.

दरम्यान, हे वर्ष तापसीसाठी खूपच फलदायी ठरले आहे. या वर्षी तिचे तब्बल चार चित्रपट प्रदर्शित झाले. यात “बदला, “गेम ओवर’, “मिशन मंगल’ आणि “सांड की आँख’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगला गल्ला कमविला. तसेच या चित्रपटात तापसीने साकारलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. आता ती अनुभव सिन्हा यांच्या “थप्पड’ चित्रपटात झळकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.