IT क्षेत्रात मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट वेतनवाढ

10% कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन

देशातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा कंपन्या कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वेतनवाढ देण्याच्या तयारीत आहेत. डेलॉइट इंडीयाच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, यावर्षी 7.3% सरासरी वेतनवाढ होऊ शकते. 2020 मध्ये 4.4% वेतनवाढ देण्यात आली होती. परंतु, 2019 मध्ये ही टक्केवारी 8.6% होती. यावर्षी 92% कंपन्यांकडून वेतनवाढ देण्यात येणार असून यात 2020 मध्ये 60% कंपन्यांनी वेतनवाढ केली होती.

डेलॉयट इंडियाच्या रिपोर्टनुसार, यावर्षी जास्तीत-जास्त कर्मचाऱ्यांना दोन अंकी वेतनवाढ मिळू शकते. गेल्या वर्षी 12% कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन अंकी वेतनवाढ केली होती. परंतु, यावर्षी 20% कंपन्या असे धोरण राबवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे, अपेक्षेपेक्षा अधिक चांगली आर्थिक रिकव्हरी, व्यवसायाच्या आत्मविश्वासात पुनरुज्जीवन, कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यावर्षी प्रत्येक क्षेत्रात वेतनवाढ दिली जाऊ शकते. सर्वात जास्त वेतनवाढ ही लाईफ सांयस आणि आयटी क्षेत्रात दिली जाईल. उत्पादन व सेवा क्षेत्रातील पगारवाढ ही सामान्य असू शकते. लाईफ सांयसमध्ये 2019 ऐवढीच तसेच डिजिटल आणि ईकॉमर्स क्षेत्रात दोन अंकी वेतनवाढ दिली जाऊ शकते. सर्वात कमी वेतनवाढ ही हॉस्पिटॅलिटी, रियल इस्टेट, इंफ्रास्ट्रक्चर आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात होईल.

डेलॉइट इंडियाचे पार्टनर आंनदरूप घोष म्हणतात की, व्यापाराने वेग पकडला असून कंपनी वेतनवाढीवर अफोर्डेबिलिटी आणि फिक्स्ड कॉस्टच्या वाढीनुसार खर्च करत आहे. 2020 मध्ये 60% कंपन्यांनी वेतनवाढ दिली होती आणि त्यातील एक तृतीयांश म्हणजे 20% ने वर्षाच्या मध्यात वाढ केली होती. ज्या कंपनीने गेल्या वर्षी वेतनवाढ दिली नव्हती त्यातील 30% कंपन्या यावर्षी जास्तीत-जास्त वेतनवाढ करत मागील नुकसान भरपाई देणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.