महाराष्ट्राच्या खो-खो संघाला दुहेरी मुकुट

मुंबई – राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने सलग सातव्यांदा दोन्ही गटांत विजेतेपदाचा मान मिळवला आहे.

महाराष्ट्राने कुमार गटात दिल्लीचा 11-9 असा पराभव करत या गटातील 32 वे विजेतेपद साकार केले, तर मुलींच्या गटात महाराष्ट्राने कोल्हापूरला 12-9 असे पराभूत करत 23 वे विजेतेपद पटकावले.

कुमारांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीला 11-9 असे नमवले. महाराष्ट्राच्या आदित्य कुदळे, सूरज झोरे, किरण वासावे, सिराज भावे, विवेक ब्राह्मणे यांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळे महाराष्ट्राचा विजय साकार झाला.

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा 12-9 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या अश्‍विनी शिंदे, अंकिता लोहार, संपदा मोरे, दीपाली राठोड, वृषाली भोये यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली व संघाला एक सोपा विजय प्राप्त करून दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.