विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडाचा डोस

पुणे  – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील पाच महिन्यांत मध्य रेल्वेच्या विविध मार्गावरील कारवाईतून तब्बल 4 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने करडी नजर ठेवली आहे. गेल्या पाच महिन्यांत रेल्वेच्या तिकीट तपासणीस पथकाकडून 70 हजार 983 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, इतर विविध घटनांमधील कारवाईत दोषींकडून 3 कोटी 88 लाखांचा दंड वसूल केला आहे.

ही कारवाई चालू वर्षातील एप्रिल ते ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 50 लाखांचा दंड अधिक वसूल करण्यात आला आहे.
गतवर्षी याच कालावधीत 64 हजार 139 जणांवर कारवाई करत 3 कोटी 54 लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. ही कारवाई पुणे रेल्वे विभागाचे प्रबंधक मिलिंद देऊस्कर, अपर रेल्वे विभाग प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा व अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.