अभिनेता दिलजीत दोसांज याने “गुड न्यूज’ या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा करिनासोबत स्क्रिन शेअरिंग केले. यादरम्यान त्याला सिनेसृष्टी आणि प्रेक्षकांवर करिनाची जादू आजही का कायम आहे हे जाणून घेता आले.
त्याच्याशी बातचीत करताना करिनाच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक वैशिष्टे त्याने सांगितली. दिलजीत सांगतो, करिना माझी फेवरिट ऍक्ट्रेस आहे. तिच्या अभिनयाला आणि सौंदर्याला खरोखरीच तोड नाही.
View this post on Instagram
#GoodNewwz THIS FRIDAY ???? Advance BOOKING OPEN ???? #diljitdosanjh #december
अशा अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळणे हेच मुळात मी माझे भाग्य मानतो. यापूर्वी “उडता पंजाब’मध्ये आम्ही दोघांनी एकत्र अभिनय केला आहे. त्यावेळच्या अनुभवांनी मी भारावून गेलो होतो. करीना ही केवळ एक चांगली अभिनेत्रीच नाही तर माणूस म्हणूनही तिच्यात अनेक वैशिष्टे आहेत. त्याचबरोबर ती अत्यंत प्रोफेशनलही आहे.
इंडस्ट्रीत इतकी वर्षे घालवूनही आज ती वक्तशीरपणाला प्राधान्य देते ही बाब मला विशेष आवडली. कदाचित हेच तिच्या यशाचे गमक असावे असे मला वाटते. अशा अभिनेत्रीसोबत पुन्हा अभिनय करण्याची संधी मिळावी अशी इच्छा असली तरी ती पूर्ण होईल असे वाटले नव्हते; पण “गुड न्यूज’मुळे ती संधी मिळाली आणि माझी इच्छापूर्ती झाली.