कोरोना वॅक्सीन घेतली असेल तर ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

आपण देखील कोरोना वॅक्सीन घेतली असेल किंवा त्याबद्दल योजना आखत असाल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

1. लगेच कामावर जाऊ नका
लस घेतल्यानंतर अती काम करण्यापासून वाचावं. किमान दोन ते तीन दिवस शरीराला आराम द्यावा. अनेक लोकांना लसीकरणाच्या 24 तासानंतर साइड इफेक्ट जाणवत आहे अशात दोन-तीन दिवस आरोग्याकडे अधिक लक्ष द्या.

2. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
वॅक्सीन घेतल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. वॅक्सीन लाग्यावर आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत असं वाटतं असेल तर जरा सांभाळून. दोन्ही डोज घेतले जात नाही तोपर्यंत प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे.

3. प्रवास टाळा
आपण लस घेतली असली तरी प्रवास टाळा.

4. सिगारेट आणि दारुचे सेवन टाळा
जर आपण सिगारेट ओढत असाल किंवा दारुचे सेवन करत असाल तर वॅक्सीन घेतल्यावर काही काळ हे सर्व सोडणे योग्य ठरेल. तसेच मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन देखील टाळाणे योग्य ठरेल.

5. डॉक्टरांच्या संपर्कात राहा
आपल्याला पूर्वीपासून एखाद्या औषधाची अॅलर्जी असल्यास सावध राहणे गरजेचे आहे. वॅक्सीन लावल्यावर आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कुठलीही अस्वस्थता जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6. मास्क लावणे आवश्यक
वॅक्सीन घेतल्यानंतरही मास्क लावणे अ‍ती आवश्यक आहे. दोन्ही डोज शरीरात गेल्यानंतरच अँटीबॉडी तयार होतात अशात जरा निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

7. हायड्रेटेड राहा
वॅक्सीन घेतल्यावर जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करा. आहारात फळं, भाज्या, नट्स सामील करा. याने शरीर मजबूत राहतं.

8. वर्कआउट टाळा
लसीकरणानंतर बाजूत वेदना होऊ शकते. अशात दोन-तीन दिवस वर्कआउट टाळणे योग्य ठरेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.