मुंबई: अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सकाळ उजाडली तीच हिंगणघाट पिडितेच्या मृत्युच्या दुःखद बातमीने. ही घटना घडल्यापासून मी अस्वस्थ होते. कालपरवाच जालना येथेही एका मुलीचा विनयभंग करुन तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.आपल्या नव्या पिढीला काय झालंय? समाजातील काही असंवेदनशील लोक अशी कृत्ये करतात.
हे थांबावं यासाठी आपण पुढाकार घेऊ. ‘तुला लाज वाटत नाही का?’ (Shame on you ) हे छेडछाडीच्या विरोधातील एक कॅम्पेन आपण सुरु करतोय. छेडछाड करणाऱ्यांना आपली स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. आपण सर्वजण मिळून हे कॅम्पेन यशस्वी करु. हा सामाजीक प्रश्न आहे,आपण सर्वजण मिळून यावर तोडगा काढू.