मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं अचानक जाणं हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. यानंतर सोशल मीडियावर विविध विषयांवरून चर्चा होत आहे. काहीजण नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं बोलत आहेत यातच बॉलिवूडमधील गायिका नेहा कक्कड ने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टमुळे नेहा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत अली आहे.
नेहा म्हणते आहे की, ‘मी पुन्हा झोपायला जात आहे. जेव्हा एक चांगले जग निर्माण होईल तेव्हा मला झोपेतून उठवा. एक असं जग जिथे स्वातंत्र्य, प्रेम, आदर, काळजी, मज्जा, स्वीकृती आणि चांगली माणसं असतील. अशी जागा जिथे द्वेष, नेपोटिझम, मत्सर, जजमेंट्स, हुकमती माणसं, हिटलर्स, खून, आत्महत्या आणि वाईट माणसं नाहीत. शुभरात्री! काळजी करू नका मी मरणार नाही फक्त काही काळासाठी दूर जात आहे’.’