भोर : काॅंग्रेसने महायुतीची मते खाण्यासाठी अपक्ष उमेदवार दिले आहेत, असा आरोप मांडेकर यांनी केला. पक्षाचा आदेश डावलून अपक्ष म्हणून काहींनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना निवडणुका आल्या की देवदर्शन आणि साहित्य वाटप करण्याचे आठवते. मागील दोन वर्षांपूर्वी हे उमेदवार कोठे होते, असा सवालही महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी केले.
शंकर मांडेकर हे दोन दिवसीय भोर तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मांडेकर तालुक्यातील विविध गावांना भेट देत आहेत. या दौऱ्याला भोर तालुक्यात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
या दौऱ्यात त्यांच्या समवेत प्रचार निरीक्षक वाय.ए. नारायण स्वामी, रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, जीवन कोंडे, सुनील चांदेरे, संतोष घोरपडे, अशोक शिवतरे, बाळासाहेब गरुड, स्नेहल दगडे, किसन नांगरे, सचिन आमराळे ,संतोष घोरपडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड, प्रवीण जगदाळे, तानाजी चंदनशिव, रमेश पवार आदी महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भोर विधानसभा मतदारसंघाचा विकास घराणेशाहीत खुंटलेला आहे. जनता आता या घराणेशाहिला कंटाळली आहे. या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देईल, असा विश्वास महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केला.